About Us

About SMART UDYOG MISSION

Raj$hree Found@tion संचालित स्मार्ट उद्योग मिशन अंतर्गत आम्ही आपणास आपल्या सुरु असलेल्या व्यवसायास पूरक असे व्यवसाय देऊन आपणास आपल्या मिळकती मध्ये भर देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपणास माहितच असेल कि सध्याच्या व्यवसायिक वातावरणात आपणास कोणीही व्यवसाय उभारणीसाठी मदत करत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची मदत कोणामार्फत करण्यात येत नाही. आपण नेहमी समाजात बघतो कि , श्रीमंत असलेल्या व्यक्तींकडे उत्पन्नाचे अनेक साधने असतात ! त्यांच्याकडे वेगवेगळ्या मार्गाने पैसा येतच असतो .
त्यांचे वेगवेगळे व्यवसाय असतात, शेतीतून पैसा येतो,  भाडे, शेअर्स, सारख्या अनेक माध्यमांतून त्यांच्याकडे पैशाचा ओघ सतत चालू असते,  म्हणजे समजा एका स्त्रोतामधून पैसा येणे कमी झाले तरी, त्यांना विशेष फरक पडत नाही आणि ही अशी परिस्थिती नव उद्योजकांना फारच आकर्षक वाटते.
बऱ्याच जणांशी बोलल्यावर हे लक्षात येते कि, ते एका व्यवसायात थोडे बहुत यशस्वी झाले कि , लगेच multiple income देणाऱ्या मार्गाकडे जातात आपण म्हणाल पैसा येत असेल तर त्यात वाईट ते काय?  मोठे मोठे उद्योजक पण अनेक उद्योग करतातच ना? पण खरी मेख इथेच आहे. जी आपल्याला कोणीच सांगत नाही मित्रांनो ही कॉमन सेन्स ची गोष्ट आहे कि , आपण जो पर्यंत आपल्या पहिल्या income देणाऱ्या साधनाला प्रचंड मोठ्ठ केल्याशिवाय दूसऱ्या गोष्टीत हात घालू नये पहिला इन्कम सोर्स एवढा मोठा करावा कि त्यातून नॉन स्टॉप पैसा येतच राहिल. एकदा आपण ते कन्फर्म केलं कि मग , इतरत्र लक्ष , वेळ आणि पैसा घालायला हरकत नाही. नाहीतर ते म्हणतात ना, " तेल ही गेले आणि तूप ही गेले" अशी परिस्थिती होऊन जाते. Videocon चं उदाहरण आपल्यासमोर ताजं आहे Appliances आणि D2H या CORE बिझनेस ला पूर्ण फोकस करण्याऐवजी, पेट्रोलियम आणि खाणीत गुंतवणूक करून त्यांनी स्वतःची माती करवून घेतली .KENT सा२खी फक्त वॉटर प्युरिफायर बनवणारी कंपनी अप्लायंसेस मध्ये आली, SAMSUNG , LG , Haier, Godrej सारख्या कंपन्यानी पण इतर उत्पादने काढलीच की , पण त्यांनी त्यांच्या CORE बिझनेस कडे दुर्लक्ष केले नाही. त्यामुळे एकच सiगणे, कि जोपर्यंत पहिला income source दणकट आणि मजबूत बनत नाही , तोपर्यंत इतरत्र लक्ष घालू नये .त्याची योग्य वेळ येऊ द्या, वेळ आली कि मग अभ्यासपूर्ण रितीने दूसरे तिसरे income option निवडा, मात्र तोपर्यंत आपल्या पहिल्या क्षेत्राकडे पूर्ण " फोकस " ठेवा. त्याचसोबत आपला सध्या सुरु असलेल्या व्यवसायाला आम्ही पूरक असे जोडव्यवसाय देऊन तुम्हाला आर्थिक द्रुष्ट्या मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे सहभागी व्हा आपल्या स्मार्ट उद्योग मिशन मध्ये....