ad-banner
News Details
Home / Schemes / ‘ईपीएफओ’कडून 1 एप्रिल, 2020 पासून 52.62 लाख ग्राहकांच्या ‘केवायसी’चे अद्यतन

‘ईपीएफओ’कडून 1 एप्रिल, 2020 पासून 52.62 लाख ग्राहकांच्या ‘केवायसी’चे अद्यतन


‘ईपीएफओ’कडून 1 एप्रिल, 2020 पासून 52.62 लाख ग्राहकांच्या ‘केवायसी’चे अद्यतन

नवी दिल्ली, 3 जून 2020
कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या अवघड काळामध्ये विस्तृत प्रमाणावर ऑनलाईन माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचा लाभ घेवून ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाच्यावतीने केवायसी म्हणजेच ‘नो युवर कस्टमर’ या अंतर्गत आपल्या ग्राहकांच्या माहितीचे अद्यतन करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. दि. 1एप्रिल,  2020 पासून सुरू झालेल्या या सेवेचा लाभ 52.62 लाख ग्राहकांनी दोन महिन्यात घेतला आहे. एप्रिल आणि मे दोन महिन्यात ईपीएफओच्या 39.97 लाख ग्राहकांनी आपल्या आधार क्रमांकाची जोडणी केली. तसेच 9.87 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाचे अद्यतन आणि जोडणी करून घेतली. तसेच 11.11 लाख फंड ग्राहकांनी आपल्या बँक खात्याला पीएफचे खाते जोडले. केवायसी ही एकदाच करावी लागणारी प्रक्रिया आहे. फंड कार्यालयामार्फत यूएएन म्हणजेच युनिव्हर्सल अकौंट नंबर दिला जातो. त्या क्रमांकाबरोबर केवायसीचा तपशील जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व तपशीलांच्या लिंकच्या माध्यमातून ग्राहकांची ओळख  पडताळणी करणे सोईचे ठरते. 
 
या मोहिमेमुळे आता ईपीएफओच्या बहुतांश ग्राहक  ‘केवायसी सक्षम’ बनले आहेत. टाळेबंदीच्या काळामध्ये नोंदींच्या दुरूस्तींचे ऑनलाईन कामे करण्यात आली. यामध्ये 4.81लाख ग्राहकांनी नावांमध्ये सुधारणा करून घेतल्या, 2.01लाख जणांनी जन्मतारखेच्या नोंदीमध्ये बदल करून घेतले. आणि 3.70 लाख जणांच्या आधार क्रमांकामध्ये सुधारणा करण्यात आल्या. 
 
टाळेबंदीच्या काळामध्ये कार्यालयामध्ये सामाजिक अंतर राखून आपल्या कर्मचा-यांना सुरक्षा देवून ईपीएफओने सर्व ग्राहकांसाठी केवायसी अद्ययावत करण्याची सुविधा दिली होती. हे करताना फंड कार्यालयाने दुहेरी धोरण स्वीकारले होते. त्यानुसार केवायसी तपशीलामध्ये ऑनलाईन सुधारणा करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आणि त्याचबरोबर जो कर्मचारी वर्ग घरामध्ये बसून कार्यालयीन काम करणार आहे, त्यांच्यावर हे काम सोपवण्यात आले. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची काळजी घेता आली. सर्वात अधिक जन्मदिनांकाच्या नोंदीविषयी दुरूस्ती कराव्या लागतात. हे लक्षात घेवून ज्यांच्या जन्मदिनांकाच्या नोंदीमध्ये तीन वर्षांपर्यंतचे अंतर आहे, त्यांच्यासाठी कोणतीही मतभेदाची परिस्थिती निर्माण होवू नये म्हणून आधार कार्डावरील नोंद पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली. त्यामुळे जन्मनोंदींच्या दुरूस्तीच्या प्रक्रियेत सुलभता आली आणि हे संपूर्ण काम वेगाने झाले. केवायसी अद्यतनासाठी सदस्याला पोर्टलव्दारे ऑनलाईन सेवा देण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना फंडामधून पैसे काढणेही शक्य झाले. कोविड-19 मध्ये जाहीर झालेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत (पीएमजीकेवाय) ग्राहक ऑनलाईन सर्व रक्कम काढू शकतो किंवा अनामत रक्कम घेवू शकतो. नोकरी बदलण्यात आली असेल तर कोणतीही किचकट प्रक्रिया ठेवली नसून अतिशय सरलतेने नव्या नोकरीचा पीएफ आहे त्याच खात्यामध्ये जमा करता येवू शकतो. ज्यांचे केवायसी पूर्ण झाले आहे अशा पीएफ ग्राहकांना ऑनलाईन किंवा उमंग अॅपच्या माध्यमातून पीएफ हस्तांतरण किंवा  पीएफ काढून घेणे सोईचे झाले आहे. 
 
कोविड-19 महामारीमुळे अनेक प्रतिबंध लावण्यात आले होते तरीही ‘ईपीएफओ’ ऑनलाईन सेवेचा विस्तार करून आपल्या सदस्यांना घरबसल्या सेवा देण्यासाठी कटिबद्धता ईपीएफओने कायम राखली. यामुळे दावे निकालात काढणे, ईपीएफओची अनामत रक्कम देणे, फंडाचे हस्तांतरण करणे, निवृत्ती वेतन प्रक्रिया कमीत कमी वेळेत पूर्ण करणे यामुळे ईपीएफओच्या कामामध्ये गुणात्मक सुधारणा झाली तसेच ही कामे प्रभावी ठरली. 
Posted On: 03 JUN 2020 3:30PM by PIB Mumbai

Rating Star

0 comment

Leave a comment


Related news

Author Details

side-banner
side-banner

RECENT COMMENTS